व्हीएसआरएस न्युज पिंपरी -शहराच्या विविध भागातील 228 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद.
शहरातील 2 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा 5 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 304 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 60 हजार 451 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
सध्या 1 हजार 357 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 288 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 69 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
पुण्यात आज, दिवसभरात 320 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची तर 302 रुग्णांना डिस्चार्ज.
पुणे पालिका हद्दीत 10 कोरोनाबाधित रुग्ण तर पुण्याबाहेरील 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 647 इतकी झाली आहे.
शहरात 231 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 3031 झाली आहे.
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 81 हजार 547 इतकी झाली आहे. पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 69 हजार 869 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर पुणे शहरात आज एकाच दिवसात 6 हजार 226 नमुने घेण्यात आले आहेत.
Discussion about this post