व्हीएसआरएस न्युज पिंपरी -राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार बनसोडे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली व पक्षाच्या जुन्या मातबर शिलेदारांना व युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पालिकेत महाविकासाआघाडीची सत्ता आणून म. वि. आ. चा महापौर कसा बनवता येईल या विषयी कानमंत्र दिला.
यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आझमभाई पानसरे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे,जगदीश शेट्टी यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी त्यांनी आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाची ही पाहणी केली, बूथ कमिटी मजबून करण्यासाठी तयार केलेल्या संगणकीय प्रणालीचा आढावा घेतला व त्याचे कौतुक केले. कार्यालयातून सामान्य नागरिकांसाठी राज्यशासनाच्या शासकीय योजना कशा पद्धतीने राबविल्या जातात याचा देखील आढावा घेतला.
यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आझमभाई पानसरे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी नगर सेवक जगदीश शेट्टी, निलेश शिंदे, नगरसेवक विक्रांत लांडे, बाळासाहेब ठाणगे, प्रसाद शेट्टी, प्रतीक इंगळे, शशीकांत घुले सुधाकर भोसले, निहाल पानसरे, हे उपस्थित होते.
Discussion about this post