व्हीएसआरएस न्युज पिंपरी दिवंगत कै. मा. आण्णासाहेब मगर यांच्या कर्तुत्वाने उदयास आलेल्या महानगरपालिकेच्या 39 व्या वर्धापनदिन व देश स्वातंत्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षात आज ह्या नगरीचा देशातल्या 100 प्रमुख स्मार्टसिटीत पिंपरी चिंचवड शहराच्या समावेश झाला.
कामगार नगरी ते सर्व सुविधांयुक्त अद्यावत श्रीमंत महानगर पालिकेचा नावलौकिक अल्पावधीचं मिळाला.
आज, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या 39 व्या वर्धापन दिनानिमीत्त पालिकेच्या स्थापनेला मोलाचा वाटा असणारे कै. मा. आण्णासाहेब मगर यांच्या स्मृतीस्थळाला पुष्पहार अर्पण केले. तसेच वर्धापन दिनानिमीत्त महापालिकेच्या आवारात आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन केल.
प्रसंगी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील, पक्षनेते नामदेवराव ढाके, उपमहापौर हिरा नानी घुले, मा. उपमहापौर केशव घोळवे, मनसे गटनेते सचिन चिख़ले, कर्मचारी महासंघाचे अंबर चिंचवडे, महापालिकेचे उल्हास जगताप, आण्णा बोदडे, प्रफुल्ल पुराणीक व पालिकेच कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post