व्हीएसआरएस न्युज पिंपरी- महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील ओपीडी 28 मे पर्यंत सुरु होण्याची शक्यता ..
याबाबतचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहर अध्यक्ष माधव पाटील यांनी दिली आहे.
माधव पाटील यांनी आयुक्तांची भेट घेऊन इतर आजाराच्या रुग्णांच्या परिस्थितीबाबत माहिती देऊन करोना रुग्ण कमी झाले असल्याने वायसीएममधील ओपीडी सुरु करण्याची मागणी केली होती.
आयुक्त राजेश पाटील यांनी तातडीने यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर वाबळे यांना आपल्या दालनात बोलावून घेतले आणि 28 मे पर्यंत रुग्णालयामध्ये ओपीडी सुरु करण्याचे आदेश दिले.
माधव पाटील यांचा मुद्दा पटल्याने आयुक्तांनी ताबडतोब आदेश दिल्याने आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांसाठी हे फायद्याचे ठरणार आहे.
माधव पाटील यांनी आपली भूमिका मांडताना म्हणले की खाजगी रुग्णालयांचे दर सर्वांना परवडण्यासारखे नाहीत. लवकरच पावसाळा येत आहे. पावसातून डासांची उत्पत्ती होऊन त्याद्वारे आजारांचा उपद्रव सुरु होतो. डासांचा हा उपद्रव पावसाळ्यात कित्येक पटींनी वाढतो. मलेरिया, चिकुनगुणिया आणि डेंग्यूसारखे आजार डोके वर काढतात. तसेच इतर आजारांमुळे नागरिकांना दवाखान्यात जावे लागते. यामुळे ओपीडी सुरू करावी, अशी मागणी माधव पाटील यांनी केली होती.