व्हीएसआरएस न्युज पिंपरी- महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शनिवारी (दि. 22) शहरात 641 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील रुग्णांची आकडेवारी पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली नाही.
आजपर्यंत शहरातील 2 लाख 45 हजार 413 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 42 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 28 व शहराबाहेरील 14 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील व शहराबाहेरील 5800 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात 7358 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत याबाबत पालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 4448 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 3352 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 7800 इतकी आहे.
शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. लक्षणे तीव्र नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार केले जातात. एप्रिल महिन्यामध्ये घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 20 हजारांच्या जवळ गेली होती. तर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही 10 हजारांवर पोहचली होती. गेल्या आठड्यापासून करोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. आज गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या अवघी 3352 इतकी आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यापाठोपाठ शहरातील बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. शनिवारी 5374 रुग्ण बरे झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 34 हजार 392 इतकी झाली आहे. तसेच 24 तासांतील रुग्णसंख्याही घटली आहे. त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.