व्हीएसआरएस न्युज पिंपरी : रहाटणी, कोकणे चौकातील मीरचंदानी पाल्मस या गृहनिर्माण सोसायटीत कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. सलग आठ दिवसात या सोसायटीत ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात वयोवृद्ध, लहान मुलांचा समावेश आहे. ही सोसायटी देखील ‘सील’ करण्यात आली आहे.
पिंपळे सौदागर-रहाटणी कोकणे चौक येथील रामबाग कॉलनीत मीरचंदानी पाल्मस ही मोठी गृहनिर्माण सोसायटी आहे. २०० हून अधिक सदनिका आहेत. महापालिका प्रशासनाकडून सोसायटीतील सर्व रहिवाशांची कोरोना अँटीजेन चाचणी केली जात आहे. सोसायटी सील केली जाणार आहे. एकाच सोसायटीत एवढे रूग्ण सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ६०० वर आलेल्या सक्रिय रुग्णांची दुप्पट झाली असून १२०० वर गेली आहे. गेल्या आठवड्यापासून दरम्यान हे रुग्ण आढळले असून त्यात सोसायटीतील सर्वांची चाचणी केली जाणार असून त्यासाठी कॅम्प लावला जाणार आहे.
याबाबत सहाय्यक आरोग्य वैद्यकीय डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले,”रहाटणी कोकणे चौक येथील मीरचंदानी पाल्मस गृहनिर्माण सोसायटीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. ३२ रुग्ण एकाचदिवशी पॉझिटिव्ह आले नाहीत. २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान ३२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सोसायटी सील केली असून ‘कंटेन्मेंट झोन’ जाहीर केला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले आहे. सर्वांची चाचणी केली जात आहे. सर्वांना क्वारंटाईन केले आहे. वैद्यकीय विभाग लक्ष ठेवून आहे.”
Discussion about this post