व्हीएसआरएस न्युज बारामती : पोलीसनामा ऑनलाइन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इलेक्ट्रीक वाहन चालवण्याचा मोह आवरला नाही. अजित पवार यांनी बारामतीतील पियाजो कंपनीच्या इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल घेतली आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे खुद्द इलेक्ट्रीक रिक्षा चालवली आहे. यावेळी अजित पवार यांचा बारामती दौरा होता.
यावेळी त्यांनी पियाजिओ कंपनीला भेट दिली आहे.
भारतात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहे. यावरून आता इलेक्ट्रिक वाहनांची (Electric vehicles) क्रेझ निर्माण झाली आहे. अनेक कंपन्या देखील प्रचंड प्रमाणात इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यात उतरत आहेत. दरम्यान, अजित पवार हे आज (शनिवारी) बारामती दौऱ्यावर असताना पियाजिओ कंपनीला भेट दिली. त्यावेळी इलेक्ट्रीक रिक्षाबाबत (Electric Rikshaw) कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. इलेक्ट्रीक रिक्षा नेमकी चालते कशी, याबाबत जिज्ञासा अजित पवार यांना पडले.
दरम्यान, त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी या रिक्षाच्या इलेक्ट्रीक बॅटरीचे, मायलेजची चौकशी केली आणि स्वत: कंपनीच्या आवारात रिक्षा चालवून बघितली. रिक्षा चालवताना अजितदादांचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. तसेच, त्यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी इलेक्ट्रीक वाहने सोयीस्कर आहेत, असं देखील कंपनीचे कौतुक केले आहे.
Discussion about this post