व्हीएसआरएस न्युज पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (गुरुवारी) फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
. ‘कोविशिल्ड’ लशीचा साठा उपलब्ध नाही. त्यामुळे उद्या कोविशिल्ड लस मिळणार नाही.18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार!
नवीन भोसरी रुग्णालय, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल आणि पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा या 4 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 100 च्या क्षमतेने लस मिळणार आहे. कोविन ॲपवर नोंदणी करुन स्लॉट बुक केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.
45 वर्षापुढील नागरिकांना ‘या’ केंद्रांवर मिळणार लस
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, अहिल्याबाई होळकर महापालिका शाळा सांगवी, इएसआयएस हॉस्पिटल मोहननगर आणि नवीन जिजामाता रुग्णालयात 100 च्या कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. ‘ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप’ या पद्धतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे. उद्या सकाळी 9 वाजल्यानंतर टोकन वाटप करण्यात येणार आहे.
Discussion about this post