व्हीएसआरएस न्युज पिंपरी- शहराच्या विविध भागातील 590 नवीन कोरोना बाधित..
शहरातील 26 आणि महापालिका हद्दीबाहेरील 14 अशा 40 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 3 हजार 942 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 47 हजार 722 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 69 लाख 48 हजार 874 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 40 लाख 54 हजार 861 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 3 लाख 26 हजार 850 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. देशात सध्याच्या घडीला 25 लाख 86 हजार 782 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली असून, कोरोनाने आजवर 3 लाख 07 हजार 231 जणांचा बळी घेतला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.14 टक्के एवढा आहे. तर, देशाचा रिकव्हरी रेट 89.26 टक्के एवढा झाला आहे.
देशात आजवर 33 कोटी 25 लाख 94 हजार 176 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 20 लाख 58 हजार 112 चाचण्या सोमवारी (दि.24) करण्यात आल्या आहेत.
देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 19 कोटी 85 लाख 38 हजार 999 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. त्यापैकी 15 कोटी 51 लाख 44 हजार 087 जणांना लसीचा पहिला डोस तर, 4 कोटी 32 लाख 99 हजार 463 जणांना लस लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात 24 लाख 30 हजार 236 जणांना लस टोचण्यात आली आहे.