व्हीएसआरएस न्युज पिंपरी -18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार!
सावित्रीबाई फुले प्राथमिक स्कुल भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, अहिल्याबाई होळकर महापालिका शाळा सांगवी, खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय या 8 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 200 च्या क्षमतेने लस मिळणार आहे.
45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार
प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, ईएसआयएस हॉस्पिटल चिंचवड, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय, निळु फुले नाट्यगृह सांगवी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख इंगोले शाळा आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या केद्रांवर 45 वर्षांपुढील नागरिकांना पहिला, दुसरा डोस 100 च्या क्षमतेने देण्यात येणार आहे.
Discussion about this post