व्हीएसआरएस न्युज पिंपरी- कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाययोजना युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहेत.
महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी रहावे व कोरोना आजारापासून संरक्षण मिळावे याकरिता महापालिका कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात आले आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेण्याबाबत तीनवेळा कळविण्यात आले आहे. तरी, देखील अद्यापपर्यंत बहुतांशी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
अद्यापपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसेल. तर, त्यांनी 20 जुलैपर्यंत लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. अन्यथा जुलै महिन्याचा पगार स्थगित करण्याबाबत विचार करण्यात येईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.
Discussion about this post