व्हीएसआरएस मराठी न्युज –कुदळवाडी मध्ये गोवर या संसर्गजन्य आजाराचे संशयित रुग्ण आढळल्याने आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयातील बालरुग्ण कक्षालातील सर्व डॉक्टर यांनी कुदळवाडी परिसरातील बालकाची पाहणी करुन लसीकरण बाबत माहिती दिली सुरू करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा दिला.
सध्या गोवर या आजाराची लक्षणे असणार्या बालकांचे रक्ताचे नमुने घेतले तसेच लसीकरण पूर्ण न झालेले बालकांना या आजाराची लागण झाल्याचे उघड झाले आहे. या आजाराची तीव्रता कमी करून त्यांचा फैलाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तसेच ज्या वस्त्यांमध्ये बालकांना लस घेण्यापासून रोखण्यात येते अशा ठिकाणी वस्त्यांमधील मान्यवर व्यक्तींशी बोलून गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य असा आजार असून लसीकरणामुळे तो टाळता येतो. हा आजार पाच वर्षांखालील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरीरावर लाल, सपाट पुरळ ही आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्यूमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते. लसीकरणामुळे गोवर, रुबेला सारखे आजार टाळता येत आहे.डॉ वैद्यकीय अधिकारी पवन साळवे यांनी लसीकरणाचे महत्त्व याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.
या वेळी पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयातील सर्व प्रमुख डॉक्टर वैद्यकीय अधिकारी पवन साळवे,स्वी सदस्य दिनेश यादव उपस्थित होते.
Discussion about this post