व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी –भारतीय संस्कृती, रुढी व परंपरेचे जतन करत असताना, वृक्ष संवर्धन जनजागृती, रेड डॉट जनजागृती, डोकलाम, स्वच्छता अभियान, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया जनजागृती, करोना मुक्त परिसर ,हर घर तिरंगा असे विविध उपक्रम राबवत सालाबाद प्रमाणे यावर्षीही श्री. कैलासभाऊ कुटे यांच्या संकल्पनेतून ” ॲनिमिया जनजागृती दहीहंडी ” उत्सवाच्या माध्यमातून ॲनिमिया (रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता) हे प्रमाण विशेषता महिलांमध्ये दिसून येतात.
ॲनिमियापासून मुक्तता करण्यासाठी आपण या जनजागृती मध्ये सहभागी होऊन, सर्वसामान्य नागरिकापर्यंत हा विषय पोहोचवण्याचे पुण्यकर्म आपल्या सर्वांच्यामार्फत व्हावा. तसेच जनजागृतीतून समाज प्रबोधन व सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य आपल्या साक्षीने व आशीर्वादाने सातत्याने चालत आहे. तसेच नोकरी व्यवसाय शिक्षण व आरोग्य अशा विविध प्रकारचे कार्य करत असताना आपल्या दत्तवाडी भागात नागरी समस्या सोडवण्यापासून ते सांस्कृतिक आरोग्य व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून कैलास कुटे यांना नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे .त्याबद्दल कैलास कुटे यांनी नागरिकांचे आभार..,…..मानले.
यावर्षीही आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा भव्य दिव्य ॲनिमिया जनजागृती दहीहंडी उत्सव 2022 साजरा होत आहे.
तरी सदरील उपक्रमास परिसरातील सर्व नागरिक व माता भगिनींनी ॲनिमिया जनजागृती करून सामाजिक कार्य व पुण्यकर्म करावे.असे आवाहन कैलास कुटे यांच्या कडून करण्यात आले आहे.
या तपासणी व उपचारासाठी श्री. कैलास गणपत कुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये नोंदणी करावी नोंदणी केलेल्या महिलांची ॲनिमिया तपासणी करण्यात येईल.
अनिमिया म्हणजे काय..?
ऍनिमियामध्ये रक्तातील तांबड्या पेशींची म्हणजे RBC ची संख्या कमी होते, तसेच RBC मधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असते. ऍनिमिया हा विकार रक्ताल्पता, पांडूरोग (रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर पांढरे पडते), रक्तक्षीणता, अरक्तता या अन्य नावांनीसुद्धा ओळखला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून ऍनिमियाचे निदान केले जाते.
अरक्तता या अन्य नावानी ओळखला जातो. रक्तातील हिमोग्लोबिन प्रमाण पासून एनिमियाचे निदान केले जाते. Information about anemia in Marathi
हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनला तांबड्या पेशींमार्फत शरीरातील उतीपर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे कार्य करत असतो मात्र कोणत्याही कारणाने RBCची संख्या कमी झाल्यास किंवा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते लेका शरीरातील विविध अवयवांच्या उतीपर्यंत ऑक्सिजनचा यी योग्य प्रकारे होत नाही.
अयोग्य आहार यांमुळे आपल्याकडे अनेक लोक ऍनिमियाने त्रस्त आहेत. विशेषतः सर्व वयोगटातील महिलांमध्ये ऍनिमियाचे प्रमाण चिंताजनक असे आहे.
अनीमियाचे अनेक प्रकार असून ते अनेकविध कारणांनी होतात. जसे,
1) Iron deficiency Anemia रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा एनीमिया.
2) Pernicious Anemia – विटामिन B12 च्या कमतरतेमुळे होणारा अनीमिया.
3) Megaloblastic Anemia – फॉलिक एसिडच्या
कमतरतेमुळे होणारा एनीमिया. 4) Sickle cell diseases, Thalassemia. जेनेटिक कारणांमुळे ह्यां प्रकारचा एनीमिया होतो.
रक्तस्त्राव झाल्याने अनीमिया उद्भवू शकतो. प्रामुख्याने अपघात, शस्त्रक्रिया, विविध कैन्सर, अल्सर, मुळव्याथ, मासिक पाळी यामुळे होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे अनीमिया उद्भवतो.
विविध विकारांमध्ये अनीमिया हे लक्षण आढळते. जसे किडनी फेल्युअर, आमवात, संक्रामक TB, विविध कैन्सर, हायपोथायरॉडिजम, रोग प्रतिकारक क्षमतेचे विकारांमध्ये रक्ताल्पता अनीमिया हे लक्षण आढळते.
भोजनातील लोह, विटामिन B12, फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे,
योग्य वयापुर्वीच गर्भावस्था येणाऱया स्त्रियांमध्ये, मासिकस्त्रावावेळी अधिक रक्त स्त्राव झाल्याने
महिलांमध्ये,
• अतड्यांतील कृमींमुळे,
• रक्तस्त्रावयुक्त मुळव्याधीच्या विकारांनी पिडीत रुग्णांमध्ये
अरकतता उत्पन्न होते.
शरीर पांढरे पडणे, त्वचा पांढरी, निस्तेज होणे,
• चक्कर येणे,
शारीरीक दुर्बलता, थकवा जाणवणे,
छातीत धडधडणे,
• रुग्ण भरभर श्वास घेऊ लागतो (Breathlessness)
भूक मंदावणे,
चेहरा, पाय, शरीरावर सुज आलेली आढळते, अल्प परिश्रमानेसुद्धा धाप लागणे, .
• त्वचा, नखे निस्तेज रुक्ष होतात, नखे सहज तुटु लागतात,
नखे चपटी होतात ही लक्षणे अनीमिया मध्ये व्यक्त
होतात.
कार्यक्रमाचे ठिकाण-आकुर्डी गावठाण आकुर्डी प्राधिकरण मेन रोड आकुर्डी.
Discussion about this post