व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांनी गुरुवारी (दि. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास आयुक्त व प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला आहे.
नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधांची निर्मिती आणि संरचनात्मक आखणी करून शहराच्या नावलौकिकात वाढ करण्यासाठी भर दिला जाणार असून वेगाने वाढणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, रविकिरण घोडके, वामन नेमाणे, अण्णा बोदडे, राजेश आगळे आदी अधिकारी उपस्थित होते.
शेखर सिंह हे 2012 च्या बॅचचे अधिकारी आहेत. देश पातळीवर त्यांचा 306 वा क्रमांक होता. सिंह हे आयआयटी गुवाहटीचे (इंडियन इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी) पदवीधर आहेत. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील बर्केली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून स्ट्रॅक्चरल इंजिनिअरिंग शाखेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. नागपूरचे सहायक जिल्हाधिकारी, रामटेकचे प्रांताधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून सिंह यांनी काम पाहिले आहे. सातारा जिल्हाधिकारीपदाचा त्यांचा बराचसा कार्यकाळ करोनामध्ये गेला आहे. त्यांनी करोना महामारीच्या कार्यकाळात चांगले काम केले आहे.
Discussion about this post