व्हीएसआरएस मराठी न्युज –कोव्हिशिल्ड लस ही 18 वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांना पहिला, दुसरा आणि प्रिकॉशन डोस या पद्धतीने दिली जाणार आहे.
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी,महापालिकेच्या केंद्रांवर सकाळी 9.30 ते सायंकाळी 4.30 या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. गरोदर माता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीय आदींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस, कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा दुसरा आणि प्रिकॉशन डोस बाकी आहे त्यांना कोविन अॅपद्वारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग करण्याची गरज नाही. महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर त्यांचे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.
Discussion about this post