व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नेते आझम भाई पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र १९ आनंदनगर, चिंचवड स्टेशन, मोहननगर,इंदिरानगर आदी भागात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी श्रीराम मित्र मंडळ, इंदिरानगर चा राजा यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन माजी विधी समिती सभापती काळूराम पवार,युवा नेते निहाल पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बाळू पवार, किरण तेलंग,दिलीप शिंदे,संतोष तेलंगे,उमेश हनवते,गणेश धोत्रे,आमोल खलचे,पप्पू मोरे,नंदु मोरे,बळी सोनवने,
रामभाऊ बहिरवाडे,पठाण बोटे,मंगेश ओव्हाळ,नागेश राठोड,पालेखान ईराणी, नविन पानसरे,रविंद्र दिवेकर,अविनाश पाटील,गणेश शिंदे,आकाश शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post