व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -काल दुपारी परीक्षा रद्द करण्याची मान्यता मिळाली. त्यानंतर त्वरित प्रेसनोट आणि महापालिका संकेतस्थळावर टाकण्यात आले.
विविध भागातून परीक्षार्थीं आज (बुधवार) सकाळीच महापालिका परिसरात जमा झाले होते. अचानक परीक्षा रद्द केल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. महापालिकेच्या गलथान कारभाराचा या परीक्षार्थींना आर्थिक आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) या रिक्त पदासांठी 7 मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार 16 व 17 मार्च रोजी आरोग्य सेविका या पदाकरिता थेट मुलाखती चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासकीय कारणास्तव ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी असे आवाहन डॉ. साळवे यांनी केले.
Discussion about this post