व्हीएसआरएस न्युज आकुर्डी शालेय विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्यात येणार असुण नोंद करावी.
कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे रोजगार गमावलेले व पगार कपात झालेले पालक, तसेच ग्रोगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते अजित शितोळे आणि आपुलकी जेष्ठ नागरिकसंघ यांच्या पुढाकारातून पुस्तक बँक उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
दत्तवाड़ी , विठ्ठलवाड़ी , विवेकनगर आणि आकुर्डी गावठाण येथील सर्व पालक आणि विद्यार्थ्याना कळवितांना आनंद होतो की ,
इयत्ता 4 थी ते 8 वी च्या गरजू, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वही वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या करिता नाव नोंदणी सुरु आहे.
तरी आपले नाव व मोबाईल नंबरसह खालील पत्त्यावर नोंदणी करण्यासाठी संपर्क साधावा .
नाव नोंदणी साठी रेशन कार्ड, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड , व गतवर्षीची निकालाची प्रत
नोंदणी..आपुलकी जेष्ठ नागरिकसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून गरीब विद्यार्थी आणि त्यांचा पालकांचा शैक्षणिक खर्च कमी करण्यास हातभार लागणार आहे.
या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना अजित शितोळे म्हणाले, पुस्तक वाटप या उपक्रमात विद्यार्थ्यांची शाळेची पाठय़पुस्तके गोळा दिली जाणार आहेत, ज्या गरजू मुलांना पुस्तकाची गरज असेल, त्यांच्यापर्यंत ही पुस्तके पोहोचवली जातील. यासाठी पालकांनी किंवा संस्थांनी गरजू विद्यार्थ्यांची नोंदणी केली की त्यांना प्राधान्याने ही पुस्तके दिली जातील.
गुरुवार दिनांक 17 जून ते 21जून 2021
वेळ स. 10 ते 1 व सायं. 5 ते 7
अधिक माहिती साठी संपर्क +91 93733 30633 अतुल शितोळे यांना संपर्क करावा.
कार्यक्रम स्थळ
नीरज रेसीडेंसी, तूळजाई वस्ती ,विवेकनगर आकुर्डी
Discussion about this post