व्हीएसआरएस न्युज पिंपरी पिंपरी चिंचवड आयुक्त राजेश पाटील यांच्या दुस-या टप्प्यातील प्रभाग स्तरावरील आढावा बैठकांना आजपासून सुरुवात झाली.
महापालिकेच्या नेहरुनगर येथील क क्षेत्रीय कार्यालयास आज आयुक्त राजेश पाटील यांनी भेट देऊन प्रभाग क्र. ८ आणि ९ मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली, या बैठकीस नगरसदस्या सीमा सावळे, डॉ. वैशाली घोडेकर, नम्रता लोंढे, नगरसदस्य विलास मडीगेरी, समीर मासुळकर, राहुल भोसले, विक्रांत लांडगे, स्वीकृत सदस्या वैशाली खाड्ये, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, नितीन देशमुख, संजय भोसले, संजय घुबे, रामनाथ टकले, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ. करुणा साबळे आदींसह विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post