व्हीएसआरएस न्युज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत.
त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेज वरून रोज देण्यात येईल.’ अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली आहे.
कालच प्रकाश आंबेडकर यांनी यांनी तीन महिन्यांसाठी सक्रिय राजकारणातून बाजूला जाणार असल्याचे सांगितले होते. या कालावधीत पक्षाचा प्रभारी अध्यक्ष म्हणून त्यांनी रेखा ठाकूर यांची नेमणुक केली होती.
Discussion about this post