व्हीएसआरएस न्युज बुलढाणा-१ सप्टेंबर २१ (बुधवार) राजीव गांधी पंचायत राज संघटनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा बुलढाण्याचे मा. आ. हर्षवर्धनदादा सपकाळ यांचा वाढदिवस काल माेठ्या जल्लाेशात साजरा करण्यात आला, त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काल उत्साहाचे वातावरण होते.
मतदारसंघात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. माेफत आराेग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, काेराेनायाेध्दाचा सन्मान, विधवांना शिलाई मशीन वाटप यासह अनेक कार्यक्रम मतदारसंघात राबविण्यात आले हाेते त्याला जनतेभरभरुन प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी ढाेल ताश्यांचा गजरात नागरिकांनी हर्षवर्धनदादा सपकाळ यांचे स्वागत केले. सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी व हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी बुलढाणा येथे त्यांच्या निवासस्थानी माेठी गर्दी केली हाेती.
बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिचीचे अध्यक्ष मा. आ. राहुलभाऊ बाेद्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषाताई पवार यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनीसुध्दा हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेवुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या सर्वाच्या शुभेच्छांचा स्विकार करत सपकाळ दुपारी १ नतंर मतदारसंघात आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाना भेटीगाठी देण्यासाठी निघाले रात्री अकरापर्यंत नाँनस्टाँप ही सर्व धावपळ चालुच हाेती.
दरम्यान ना. वर्षाताई गायकवाड, ना. बाळासाहेब थोरात, महाराष्ट प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष तथा धुळ्याचे आमदार कुणाल पाटील, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह देशभरातुन अनेक काँग्रेसजनांनी साेशल मिडीयाच्या माध्यमातून हर्षवर्धन सपकाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post