व्हीएसआरएस न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड येथे उभारणार भव्यदिव्य भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी (Science City) है जाहीर करताना अतिशय आनंद होतोय की, आज मंत्रिमंडळाने शालेय शिक्षण विभागाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पास मंजुरी दिली. मंत्रिमंडळातील माझ्या सहकान्यांचे आभार!
भारतीय राज्यघटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे तसेच चौकसपणावर आधारित जिज्ञासा आणि सुधारणा यांना विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे ही सुद्धा प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी आहे. आपल्या देशाचे लोकप्रिय माजी पंतप्रधान आदरणीय भारतरत्न राजीव गांधी यांनी ही संज्ञा मांडली.
जागतिक दर्जाची विज्ञान नगरी
पिंपरी चिंचवडमध्ये भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी ३.२३ लाख स्क्वेअर फूट जागेवर प्रस्थापित असेल. या नगरीच्या माध्यमातून विज्ञानाशी संबंधित अनेक बाबींचा खुलासा करून देणारा एक रोमांचक अनुभव विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. विद्यार्थ्यात वैज्ञानिक जिज्ञासा वाढण्यास मदत होईल. जागतिक दर्जाची विज्ञान नगरी उभारणे हे आमचे ध्येय आहे. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पासाठी १९१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आवश्यक असल्यास अतिरिक्त निधी उपलब्ध करु.
Discussion about this post