व्हीएसआरएस न्युज भोसरी-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शुक्रवारी (दि.25) पहाटे तीनच्या सुमारास द व्ही टेक प्रा. लिमिटेड या कंपनीत प्रवेश केला.
त्यांनी त्याठिकाणी असलेल्या दोन सुरक्षारक्षकांना मारहाण केली व त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना जागीच दाबून ठेवले.
त्यानंतर आरोपींनी शटर उचकटून कॉपर, पीबी, कॉपर मिक्स, कॉपर रॉड, कॉपर स्क्रॅप व बारा हजार किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण 25 लाख 87 हजार किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून पळवला. पोलीस उपनिरीक्षक चिटमपल्ले अधिक तपास करत आहेत.
याप्रकरणी शशीमोहन नरेंद्र देव शर्मा (वय 36, रा. भोसरी, मुळगाव बिहार) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा पुरुष व दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post