व्हीएसआरएस न्युज कर्नाटकमधील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा निषेध करण्यासाठी, आज पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पुरोगामी व समविचारी संघटनांच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनामध्ये कामगार नेते काशीनाथ नखाते, सचिन काळभोर, प्रकाश जाधव, सतिश काळे, धनाजी येळकर पाटील, लक्ष्मण रानवडे, जिवन बोराडे, अजीज शेख, दत्ता शिंदे, सागर तापकीर, गणेश सरकटे, विक्रम पवार, माऊली बोराटे, अनिल राठोड, महेश पंडित, उमेश थोरात, संगमनेश्वर साबळे, गणेश तुरुकमारे, प्रल्हाद कांबळे, धम्मराज साळवी, संतोष शिंदे, मेघा आठवले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच कर्नाटक मधील जनतेने व सरकारांनी सतत महाराष्ट्राचा तिरस्कार केलेला आहे. या तिरस्काराचा एक भाग म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना, कर्नाटक मधील काही समाजकंटकांनी केलेली आहे. कर्नाटक मधील भाजपसरकारचाही या समाजकंटकांच्या कृत्याला पाठिंबा असल्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून कर्नाटक सरकारचा आणि या घटनेचा निषेध व्यक्त करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश कर्नाटक सरकारला द्यावेत अशी मागणी करावी, असे आवाहन आम्ही करत आहोत”.
Discussion about this post