व्हीएसआरएस न्युज पुणे-पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात अमित शहा यांनी गणपतीची पूजा केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मंदिरात अमित शहा यांनी गणपतीची पूजा आणि प्रार्थना केली.
CFSL कॅम्पसमध्ये ते नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी NDRF जवानांसोबत स्नेह भोजनाचा कार्यक्रम असेल. यानंतर सांयकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे. गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमानंतर दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जाणार आहेत.
Discussion about this post