व्हीएसआरएस न्युज पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भोसरी मतदार संघामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
27 नोव्हेंबर रोजी वाढदिवस असताना एक महिना अगोदर पासूनच संपूर्ण भोसरी मतदार संघामध्ये वाढदिवसाचे फ्लेक्स झळकले, आमदार महेश लांडगे यांचे चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात भोसरी विधानसभा मतदारसंघात आहे, या सर्व चाहत्यांसाठी तसेच भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली परिसरातील नागरिकांसाठी नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या वतीने चला हवा येऊ द्या हा हास्यमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी केली आहे सदर कार्यक्रम हा 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता राधास्वामी सत्संग रोड, पिंगळे रोड, चिखली येथे आयोजित करण्यात आला आहे.
Discussion about this post