व्हीएसआरएस न्युज निगडी-निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प उद्यान चौकातील ग्रेडसेपरेटर, रॅम्प व वर्तुळाकार (रोटरी) मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.
असे असतानाही हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यास महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांची, तसेच या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे.
शहराचे प्रवेशद्वार असलेल्या या चौकातील वाहतूक सुरळीत व सिप्रल फ्री व्हावी म्हणून महापालिकेने येथे ग्रेड सेपरेटर, वर्तुळाकार मार्ग व उणपूल उभारला. त्या कामास जून २०१७ ला सुरुवात झाली.
निगडी-देहूरोड मार्गावरील उगणपुल काही महिन्यापूर्वी वाहतुकीस खुला करण्यात आला. प्रकल्पातील ग्रेडसेपरेटर, रॅम्प, वर्तुळाकार मार्गाचे कामदेखील काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. स्थापत्य विभागाने ३१ मे रोजी उर्वरित मार्ग वाहतुकीस खुला करण्यास हरकत नसल्याचे पत्र महापौर उषा ढोरे यांना दिले. त्यानंतर १५ दिवस झाले तरी काहीच कार्यवाही झालेली नाही. मार्ग वाहतुकीस खुला केला जात नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. गेली चार वर्षांपासून या भागातील रहिवाशांना लांब अंतराचा वळसा घालून ये-जा करावी लागत आहे.
प्रकल्पाचे सर्व काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे तत्काळ सर्व मार्ग वाहतुकीस खुले करावेत. अन्यथा गुरुवारी (दि. १७) आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांसह भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी दिला आहे.
अपघाताची शक्यता
निगडी परिसरातील नागरिकांना उद्भणपूल ओलांडण्यासाठी मार्गच उपलब्ध नसल्याने धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडला जात आहे. तसेच, निगडी-देहूरोड उणपुलावर जाण्यासाठी विरुद्ध मार्गाने चालक आपली वाहने सर्रासपणे घुसवितात. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Discussion about this post