व्हीएसआरएस न्युज पिंपरी- मावळ तालुक्यात गुरुवारी (17 जुन) पावसाचे जोरदार कमबॅक झाले आहे. मागील 24 तासात घाटमाथ्यावरील लोणावळा शहरात 148 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पवन मावळातील पवना धरणाच्या परिसरात 74 मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.
गुरुवारी दिवसभर शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या सोबत वारा देखील मोठ्या प्रमाणात होता. महाराष्ट्रात पुढी दोन तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
लोणावळा शहरात आजपर्यत यावर्षी 539 मिमी (21.22 इंच) पाऊस झाला आहे. तर मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्या पवना धरणात यावर्षी आतापर्यत 243 मिमी पाऊस झाला असून आज अखेर धरणात 29.60 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 0.33 टक्के वाढ झाली आहे.
Discussion about this post