व्हीएसआरएस न्युज पिंपरी -अभी तो सुबह की पहेली किरण हि फुटी है.. जमाले यार देखीए निखार आने के बाद.. निगडी पोलीस स्टेशन के माध्यम से.. हमने खोल दिया है.. खुशबु का बंद.. हमने खोल दिया है.. खुशबु का बंद.. ये हवा अब तेरी जिम्मेदारी है..” असे कवितांच्या पंतीतुन संदेश देत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बालका प्रति आपली तळमळ व्यक्त केली.
लहान बालकांचे मुक्त वातावरणात सुमपदेशन, विधी संघबालकांना वाम मार्गापासून परावृत्त करने पुनर्वसन तसेन बालकांना पोलीस ठाण्यात येताना कोणताही संकोच अथवा भीती वाटु नये. याकरिता निगडी पोलीस ठाण्याच्या आवारात पहिले स्वतंत्र सुसज्ज बालस्नेही कक्षा’ची स्थापना करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आयुक्तपदाच्या वर्षपूर्ती निमित्त तसेच होप फॉर दि चिल्ड्रेन फाऊंडेशन, पुणे या सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते बुधवार (ता. 15) रोजी या कक्षाने अनावरण करण्यात आले. या प्रसंगी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त मंच पर होप फॉर दि चिल्ड्रेन फाऊंडेशन पुणे संस्थेच्या
कॅरोलीन ओडवादि वॉल्टर, व्यवस्थापक शकिल शेख, सहायक आयुक्त डॉ. सागर कवडे, निगडी पोलीस ठाण्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड पिपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, बालगुन्हेगारांना पाप पुण्याचा अर्थ कळत नसतो. अशा बालकाने ‘टॉक टु मी’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातुन आम्ही मनोवैज्ञानिक विश्लेषन केले असता हि बालक वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीतुन आलेली असल्यानी बाव समोर आली. एखाद्या चुकीचे परिणाम किती भंयकर असतील, याची त्यांना साधी पुसटशी कल्पना देखील नसते. सर्वेक्षणात काही बालक गोंधळलेली तर काही बालक मानसिक आजाराने ग्रासलेले दिसुन आली. आजारी बालकांवर योग्य उपचार झाले पाहिजेत. शिक्षा नाही. तसेच पिडीत बालकांची कौटुंबिक पार्श्वभुमी विचारात घेतली पाहिजे. एकलकोंडी बनलेल्या बालकांना आधार द्यावा. रस्त्यावरील बालके पुन्हा परिस्थितीच्या दलदलीतुन अडकणार नाहीत. याबाबत सर्वांनी दक्ष राहिले पाहिजे. ‘निड्रेन होम’ या माध्यमातुन संगोपन आणि पुनर्वसन केले पाहिजे.”
आयुक्त पुढे म्हणाले की, पिडीत बालकांना पोलीस ठाण्यात आल्यानंतर सुरक्षित वाटले पाहिजे. बाल गुन्हेगार समाजातुन उद्भवु नये. या करिता आम्ही प्रयत्न करीत आहोत. एकतर बालक आपली शक्ती होवु शकतात किंवा समस्या
होवु शकतात. अशा बालकांना शक्ती बनवायचे असेल तर त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन करून समाजाने जबाबदार नागरिक बनवले पाहिजे. चांगले समुपदेशन न मिळाल्याने वस्त्यातील बालके पुन्हा गुन्हेगार क्षेत्राकडे वळण्याचा धोका अधिक आहे. समस्यांच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात बालबेही कक्ष असणे गरजेचे आहे.”
पुढे ते म्हणाले, एका बाळाला उभा करण्यासाठी संपूर्ण समाजाची गरज असते. बाळ स्वतःहून उभे राहत नाही. ते आजुबाजुच्या पोषक वातावरणामुळे निर्मित होते. त्यामुळे समाज म्हणुन तुमची देखील तितकीच आवश्यकता आहे.”
अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे म्हणाले, आपण आपला परीसर देखील नागरिक श्रेही करू शकतो. पोलीस ठाणे हि नागरिकांना सेवा देणारी सुरक्षित केंद्र
झाली पाहिजेत. हि आपली सर्वांनी जबाबदारी आहे.”
पोलीस उपायुक्त मंचक इपर म्हणाले की, जगातील सर्वात जास्त तरुणांची संख्या भारतात आहे. 18 वर्षाखालील बालकांची संख्या देखील मोठी आहे. ती संख्या 35 टक्के एवढी मोठी आहे. हि चिंतेची बाब आहे. देशाने भविष्य घडविणाऱ्या तरुण वर्गासाठी वेळीन पावले उचलणे गरजेनी आहे. प्रत्येकाला सुधारण्याची एक संधी दिली पाहिजे.”
पिंपरी चिंचवड पोलीसांना संस्था सर्वोतरी सहकार्य करणार असल्याने होप फॉर दि चिल्ड्रेन फाऊंडेशनच्या कॅरोलीन बॉल्टर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी केले. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी आभार मानले.
Discussion about this post