व्हीएसआरएस न्युज पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच सांगवी आणि मोरवाडी चौक येथील पुतळयास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अहिल्यादेवी होळकर ह्या कुशल, मुत्सुद्दी आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या तसेच उत्तम महिला प्रशासक म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव सदोदीत होत राहील असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच सांगवी आणि मोरवाडी चौक येथील पुतळयास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्य संतोष कांबळे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, कार्यकारी अभियंता विजय भोजने, प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण रुपनर, सुर्यकांत गोफणे, अजय दुधभाते, माणिकराव बारगळ, नामदेव सोनवलकर, वीणा सोनवलकर, सदाशिव पळकर, मुकुंद कुचेकर, महावीर काळे, सोनाताई गरदे, नागेश तिथर, नागनाथ कोकरे, दत्तात्रय पिसे, बंडू लोखंडे आदी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या अहिल्यादेवी यांच्यावर कमी वयात राज्याची मोठी जबाबदारी पडली. तरी त्यांनी डगमगून न जाता धैर्याने अनेक वर्षे राज्यकारभार केला लोकोपयोगी अनेक वास्तू बांधल्या, घाट बांधले, जनावरांसाठी छावण्या उभ्या के राज्य विस्तार वाढविला अशा थोर राज्यकर्त्या अहिल्यादेवींचा आदर्श हा निश्चितच सर्वांना प्रेरणादायी ठरेल असेही त्या म्हणाल्या.
Discussion about this post