व्हीएसआरएस न्युज पुणे-राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी शनिवारी पुणे पोलिस आयुक्तालयास भेट दिली. पांडे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर विविध विभागांना भेटी देऊन पोलिसांच्या कामाची पाहणी केली.
राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर पांडे हे पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आले. प्रारंभी त्यांनी शनिवारी दुपारी बिनतारी संदेश विभागाला भेट दिली. त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी पुणे पोलिस आयुक्तालयास भेट दिली.
यावेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सहपोलिस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अतिरीक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे, डॉ.जालिंदर सुपेकर यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
पांडे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर त्यांनी भरोसा सेल व सेवा या विभागांमध्ये जाऊन तेथील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. दोन्ही उपक्रमांची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी या उपक्रमाबद्दल पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
Discussion about this post