व्हीएसआरएस मराठी न्युज बाल दिनाचे औचित्य साधून आरंभ सोशल फाउंडेशनतर्फे संभाजीनगरच्या शिव-शाहू-शंभो उद्यानात आपले अंगण उपक्रमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात बालपणीच्या आठवणीत लहान मुलं-मुली रमली होती. लहानपणीच्या विविध खेळांचा आनंद मुला-मुलींनी घेतला.
प्रभाग क्रमांक 10 मधील संभाजीनगर येथील शिव शाहू शंभो उद्यानात संपूर्ण दिवसभरात विविध खेळांचे कार्यक्रम घेण्यात आले. आपले अंगण कार्यक्रमात संभाजीनगर, शाहूनगर, मोरवाडी, विद्यानगर, मोरवाडी या सर्व भागातील मुले सहभागी झाली. जुन्या खेळांचा आनंद घेत लहान मुलं आनंदात रमल्याचे पाहायला मिळाले. तसेच, प्रभाग क्रमांक १० मधील पिरॅमिड हॉल, शाहूनगर, सिद्धिविनायक गणपती मंदिर, संभाजी नगर, स्वयंभू गणपती मंदिर, संभाजी नगर, मोरवाडी म्हाडा नवीन विरंगुळा केंद्र, रेणुका देवी प्राथमिक विद्यामंदिर. आणि विद्यानगर अशा सहा केंद्रावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
प्रभागातील सुमारे १ हजार बालकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. सहभागी मुलांना भेट वस्तू देण्यात आल्या. तसेच, प्रत्येक गटातून विजेत्या तीन मुलांना माजी उपमहापौर तथा नगरसेवक तुषार हिंगे आणि आरंभ सोशल फाउंडेशनच्या संचालिका सोनाली तुषार हिंगे यांच्या हस्ते सन्मानपत्र व गौरव चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
Discussion about this post