व्हीएसआरएस न्युज पिंपरी –ओबीसी जागर रथाचे आज चह्रोली गावामध्ये उद्घाटन करण्यात आले पिंपरी चिंचवड शहराचे मा महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते फित कापुन रथाचे स्वागत संपन्न झाले.
आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणाबाबत ओबीसी समाजाच्या जनजागृती साठी भाजपाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात ओबीसी बांधवांना आपल्या हक्कासाठी जागे करण्यासाठी ओबीसी जागर अभियान राबविण्यात आले आहे
यावेळी मा. महापौर नितीन आप्पा काळजे,भाजप महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्षा शैलाताई मोळक, भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष ऋषिकेश भाऊ रासकर, नगरसेविका सुवर्णाताई बुर्डे ,नगरसेवक अजित बुर्डे, किसान मोर्चा अध्यक्ष संतोष तापकीर भाजप कोषाध्यक्ष सचिन तापकीर ,रामदास काळजे,बाळासाहेब मोळक, विकास आण्णा बुर्डे, आनंदा तापकीर, दिलीप कोतवाल, मुरलीधर काळजे, दत्तात्रय रासकर, गणेश तापकीर, गंगाराम काळजे,पल्लवी बुर्डे अपर्णा माटे, आदी भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
Discussion about this post