व्हीएसआरएस न्युज पिंपरी केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्व नागरिकांना ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक कुटूंबासाठी पाच लाखांचा मोफत आरोग्य विमा योजना’ जाहिर केली आहे.
हि योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी शहर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे शहराध्यक्ष फारुक इनामदार यांच्या वतीने बुधवारी (दि. 4 ऑगस्ट) ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक कुटूंबासाठी पाच लाखांचा मोफत आरोग्य विमा पत्राचे वाटप आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ता अमोल थोरात, संयोजक फारुक इनामदार, भाजपा शहर उपाध्यक्ष अर्जून ठाकरे, भगवान शिंदे, किरण पवार आणि मंगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. वनिता गुळवणी, डॉ. संतोष धाडगे, डॉ. श्रीपाद परसपाटकी, डॉ. किशोर महाजन, डॉ. संजय भंडारी तसेच रुग्णवाहिका चालक सुहास पालांडे, विजय शेळके, विनायक पोलकम, भरत वाघ आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेणारे हाजी गुलाम रसुल सय्यद यांचा कोव्हिडयोध्दा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रभाग क्रमांक 9 मधिल 54 सफाई सेवकांना पावसाळी रेनकोट देऊन सन्मानीत करण्यात आले.
Discussion about this post