व्हीएसआरएस न्युज पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेला गेल्या तीन दिवसांपासून कोव्हिशिल्ड लसीचा साठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी शहरातील अनेक लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत. नागरिकांच्या सुट्टीच्या दिवशीच लस मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
रविवारी (दि. 8) शहरामध्ये फक्त कोव्हॅक्सिन लस 16 केंद्रांवर दिली जाणार आहे. त्यामध्ये 18 ते 44 व 45 वर्षावरील नागरिकांसाठी प्रत्येकी 8 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले प्रायमरी स्कूल भोसरी, प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह वायसीएम रुग्णालयाजवळ, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीवाई फुले रुग्णालय या आठ ठिकाणी 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस मिळणार आहे.
तर 45 वर्षावरील नागरिकांना प्राथमिक शाळा 92 मोरे वस्ती, इएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा पिंपळे निलख, प्रेमलोक पार्क दवाखाना या आठ केंद्रावर कोव्हॅक्सिन लस मिळणार आहे. पहिल्या डोससाठी प्रत्येक केंद्रावर 100 ची क्षमता आहे. त्यामध्ये किऑस्क टोकन प्रणालीद्वारे 80 व कोविन ऍपच्या माध्यमातून 20 लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.
Discussion about this post