व्हीएसआरएस न्युज पिंपरी दि.०८,पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महापुरूष अभिवादन यात्रा काढून महापुरूष स्मारकांना भेट देवून, वंदन करून नवनियुक्त शहराध्यक्ष डॅा. कैलास कदम यांनी पक्ष कार्याची सुरूवात केली.
या यात्रे द्वारे शहरातील विविध २१ महापुरूषांच्या स्मारकांना वंदन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यामध्ये राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॅा.बाबसाहेब आंबेडकर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे, लहूजी वस्ताद साळवे, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू स्मारक, महाराणा प्रताप, नरवीर तानाजी मालुसरे, लोकमान्य टिळक, पंडीत जवाहरलाल नेहरू, शहीद भगत सिंग, हुतात्मा नारायण दाभाडे, आण्णासाहेब मगर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदिंना यात्रेद्वारे अभिवादन करण्यात आले.
या यात्रेस कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
यात्रेबाबात माहीती देताना काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले, सर्वप्रथम महापुरूषांना अभिवादन करून त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन काँग्रेस ला गतवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प करण्यासाठी व कार्यकर्त्यांच्या मध्ये पुन्हा एक नवी उर्जा निर्माण करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली असल्याचे व येणा-या काळात मनापासून व संपूर्ण ताकदीने जनतेच्या समस्या सोडवित काँग्रेस संघटना बांधणी करण्यासाठी संकल्प बध्द होण्यासाठी महापूरूषांचे अशिर्वाद यात्रेद्वारे घेतले ” कदम यांनी सांगितले.
या यात्रेस काँग्रेस चे शहराध्यक्ष डॅा. कैलास कदम, प्रदेश काँग्रेस चे सदस्य अमित मेश्राम, माजी महापौर कवीचंद भाट, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती शाम अग्रवाल, युवक काँग्रेस पदाधिकारी आदी उपस्थित होते.
Discussion about this post