व्हीएसआरएस न्युज पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्याचा पिंपरी-चिंचवड शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना वतीने सन्मान करण्यात आला. त्यांना अभिनंदन पत्र देत त्यांच्या कार्याचा गौरव या पत्राद्वारे करण्यात आला.
मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी आपल्या अभिनंदन पत्रात नमूद केले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पदभार स्वीकारल्यापासून अतिशय उत्कृष्ट काम करत आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो. शहर स्मार्ट सिटी कडे झेपावत असताना शहर विकासाला बाधक ठरणाऱ्या बेकायदेशीर होर्डिग्ज, फ्लेक्स हटवण्याची मोहीम आपण हाती घेतली.
अतिशय प्रभावीपणे काम होत आहे. आपण करत असलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपले अभिनंदन, असेही दिलेल्या अभिनंदन पत्रात नमूद केले आहे. सदर अभिनंदन पत्र देते वेळेस शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक राहुल कलाटे उपस्थित होते.
Discussion about this post