व्हीएसआरएस न्युज मुंबई मोहरमच्या पार्श्वभूमीवर सरकरने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
कोरोनामुळे काही निर्बंध सरकारने लागू केले आहेत. वाझ मजलीस तसंच मातम मिरवणुका काढू नयेत असं आवाहन सरकारने केलं आहे. घरात राहून दुखवटा पाळा असंही राज्य सरकारने म्हटलं आहे. मोहरम ताजिया काढू नये आणि साध्या पद्धतीने मोहरम पाळण्यात यावा असं राज्य सरकारने सांगितलं आहे.
यावर्षी मोहरम दि. 19 ऑगस्ट, 2021 रोजी पाळण्यात येणार आहे. मोहरमनिमित्त विविध ठिकाणी मुस्लीम बांधवांतर्फे वाझ मजलीस तसेच मातम मिरवणूका आयोजित करण्यात येतात.
मोहरम महिन्याच्या 9 व्या दिवशी म्हणजेच दि. 18 ऑगस्ट रोजी “कल की रात” तसेच 10 व्या दिवशी “योग-ए-आशुरा” हे दिनांक 19 ऑगस्ट रोजी येत असून त्या निमित्ताने मातम मिरवूणका काढण्यात येतात. परंतू सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवूणका काढता येणार नाही.
वाझ मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया / आलम ताजिया / आलम काढू नयेत.
सबील/छबील- सबील छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी कोविड संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सदर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इ.) पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे असं आवाहन करण्यात आलं आहे.
Discussion about this post