व्हीएसआरएस न्युज पिंपरी- रिक्षा पंचायत पिंपरी चिंचवड व कष्टकरी संघर्ष महासंघ आयोजित कार्यक्रमात स्वराज अभियान महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले नोंद पावत्या चे वाटप केले.
राज्य शासनाकडून मिळणारे पंधराशे रुपये अनुदान प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुरुवात आज पिंपरी-चिंचवड शहरामध्ये करण्यात आली . शहरातील थरमॅक्स चौक, भोसरी, आकुर्डी ,निगडी, पिंपळे सौदागर या ठिकाणी मोफत फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरुवात करण्यात आली .
मानव कांबळे म्हणाले “आपल्या मागण्या साठी कायम संघर्ष करावा लागतो आहे यापुढे अधिक रक्कम मिळवण्यासाठी संघर्षासाठी आपण सर्वजण तयारी करू शासनाने या कालावधीमध्ये अधिक कागदपत्रे अथवा अडचणी निर्माण होईल अशा नियम न लावता संकट काळ आहे म्हणून सरळ सरळ मदतीची भावना ठेवावी आणि लवकरात लवकर लाभ घ्यावा .
शासकीय परवाने परमिट आणि बँक खात्याचे इत्यंभूत माहिती ही शासनाकडे असणे गरजेचे आहे त्यासाठी त्याचा डाटा संकलित करावा आणि यापुढे अर्जाची प्रक्रिया अत्यंत सुलभ करून त्यांना जलद गतीने लाभ द्यावा , विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्रांमध्ये जाऊन आपण लाभ घ्यावा.