व्हीएसआरएस न्युज पुणे- कोरोना काळात डॉक्टर, पोलिस, पत्रकार या प्रमाणे मेडिकलवाल्यांनी देखील आहोरात्र योद्ध्याप्रमाणे लोकांना सेवा दिली आहे. यामुळे सर्व मेडीकल दूकानदारांचं लसीकरण तातडीनं करा, अशी मागणी पुणे जिल्हा मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील शहा यांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री अजित पवारांकडे केली आहे.
मेडिकल दुकानदारांनी सरकारला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. पाच दिवसात लसीकरणाचा निर्णय घेतला नाही तर मेडीकल दूकानदार जाणार संपावर, अशी माहिती पुणे जिल्हा मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील शहा यांनी दिली आहे. मेडिकल असोसिएशननं सरकारला पाच दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील हजारो केमिस्ट दिवस रात्र रूग्णांची सेवा करण्यासाठी काम करत आहेत.
या दम्यान आमच्या अनेक केमिस्ट बांधवांना कोरोनाची लागण देखील झाली आहे. तसेच अनेकांचा कोरोनाने मृत्यू देखील झाला आहे, असं सुनील शहा यांनी सांगितलं.
दरम्यान, सरकारने सर्व मेडिकलमधील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही बेमूदत संपावर जाऊ, असा इशारा सुनील शहा यांनी दिला आहे.