व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पेट्रोल,डिझेल व गॅस च्या वाढत्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या वतीने ११ जुलै पासून ते १५ जुलै पर्यंत राज्यव्यापी स्वरूपात नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे.
दैनंदिन स्वरूपात आपल्या उपजीविकेत व्यस्त असलेल्या नागरिकांच्या त्रासाबाबत व उद्रेकाबाबत नागरिकांच्या भावनांना आवाज मिळवून देण्यासाठी युवक काँग्रेस ने राज्यस्तरीय स्वरूपात या मोहीमेस सुरूवात केली आहे.
या मोहीमेचा पिंपरी चिंचवड शहरातील शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. पिंपरी चौका जवळील एच पी पंपावर ह्या मोहिमेचा आरंभ करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेस च्या वतीने शहरात विविध ठिकाणी नागरिकांशी संपर्क साधून महागाई विरोधातील या आंदोलनात नागरिकांच्या सहाभागासाठी सह्या घेऊन पाठिंबा घेण्यात येणार आहे.
या मोहीमेस नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला नागरिकांचा स्वयं सहाभाग या मोहिमेचे महत्व दर्शवत होता या प्रसंगी काही नागरिकांनी स्वत: पुढे येऊन पदाधिका-यांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी बोलताना युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले,
“आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल डिझेल चे भाव कमी झाले असताना मोदी सरकारकडून सातत्याने दरवाढ केली जात आहे या देशातील मोदी सरकार पेट्रोल डिझेल च्या नावा खाली जनतेची लूट करत आहे ४० रूपायाच्या पेट्रोल ला १०५ रूपायाचा भाव, ४०० रूपायाच्या गॅस टाकीला रू ८५० चा भाव तर ५० रूपायाच्या डिझेल ला जवळपास १०० रूपायाचा भाव झाला आहे अशा प्रकारे गोरगरीब जनतेच्या संसारावर घाला घालण्याचे काम भाजपाचे मोदी सरकार करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने “एकच लक्ष मोदी सरकार विरोधात एक कोटी साक्ष” अशा एक कोटी सह्या गोळा करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे व ही मोहीम यशस्वी पणे सुरू आहे.
पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातला हा जनतेचा आवाज, मोदी सरकार विरोधातला हा आवाज काँग्रेस कार्यकर्ते करतील. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांपर्यंत आम्ही मोठ्या प्रमाणात पोहचू त्यांच्या भावना जाणून घेवून त्या दिल्ली तील निगरगट्ट मोदी सरकार पर्यंत पोहचवू व मोदी सरकारला व भाजपा नेत्यांना सळो कि पळो करून सोडा”
युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष व शहरातील या स्वाक्षरी मोहीमीचे आयोजक नरेंद्र बनसोडे यांनी नागरिकांनी उत्सुफूर्तपणे या मोहीमेत सहाभागी होऊन केंद्रातील भाजपा सराकरप्रती आपला निषेध नोंदवावा असो आवाहन केले आहे. या मोहीमेतंर्गत नागरिकांचे नाव,मोबाईल क्रंमाक व सही स्वाक्षरी पुस्तीकेत घेण्यात येणार आहे.
यावेळी डॅा. कैलास कदम, सत्यजीत तांबे व नरेंद्र बनसोडे यांनी मनोगते व्यक्त केली.
या प्रसंगी इंटक चे पुणे जिल्हा अध्यक्ष डॅा. कैलास कदम, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सरचिटणीस व पुणे जिल्हा युवक काँग्रेस चे प्रभारी शिवराज मोरे, युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव व पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस चे प्रभारी अक्षय जैन, युवक पिंपरी चिंचवड काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एन एस यु आय चे शहाराध्यक्ष डॅा. वसीम इनामदार, काँग्रेस सोशल मिडीयाचे शहराध्यक्ष आयुष मंगल, महाराष्ट्र प्रदेश एन एस यु आय चे उपाध्यक्ष ॲड.उमेश खंदारे, प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव कौस्तुभ नवले, काँग्रेस नेते अशोक काळभोर, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, शहर युवक काँग्रेस चे सरचिटणीस अपूर्वा इंगवले, योगेश नायडू, अलोक लाड, विशाल सरवदे, मिलिंद बनसोडे, संतोष देवकर, बाबा गायसमुद्रे, स्वप्निल बनसोडे, अर्णव कामठे, तेजस पाटील, अनिकेत अरकडे, करणसिंग गील, रोहित तिकोणे, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post