व्हीएसआरएस न्युज नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील नवदुर्गाचा (महिलांचा ) प्रतिनीधीक स्वरूपात आमदार बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या या आधुनिक नवदुर्गाना सन्मानित करत त्यांच्या कार्याचे कौतुक देखील यावेळी करण्यात आले. यामध्ये महिला वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या डॉक्टर, परिचारिका, महिला वाहतूक पोलीस, रिक्षाचालक महिला, शिक्षक महिला, पीएमपीएल वाहन चालक महिला, सफाई कर्मचारी महिल.., सुरक्षा रक्षक महिला, पत्रकार महिला आदी नवदुर्गांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
Discussion about this post