व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार शहरात उद्या शनिवारी आणि रविवारी दोन दिवसांच्या शहर दौ-यावर येणार आहेत.
पत्रकार परिषदेला आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, प्रवक्ते फजल शेख उपस्थित होते.
शनिवारी दुपारी साडेतीन वाजता आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात सरकारी योजनेचा नागरिकांना लाभ देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.
त्यानंतर निगडी, यमुनानगर येथील बॅक्वेट हॉल येथे आजी-माजी नगरसेवक, पदाधिका-यांची बैठक होणार आहे. तर, रविवारी दुपारी साडेतीन वाजता रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे. पवारसाहेब कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
Discussion about this post