व्हीएसआरएस न्युज पिंपरी सोमवारी (दि. १९) सकाळी नऊच्या सुमारास आळंदीतील आजोळघरातून पंढरपूरला प्रस्थान ठेवतील.
दोन एसटी बसद्वारे अवघ्या चाळीस
व्यक्तींसोबत विनाथांबा ही वारी वाखरीपर्यंत नेण्यात येणार आहे. दरम्यान वारीच्या प्रवास मार्गांवर गावोगावी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाकडून संपूर्ण वारी ने आण करण्याची जबाबदारी खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर माऊलींच्या चलपादुका घेऊन जाणाऱ्या शिवनेरी बसचे सारथ्य लक्ष्मण पांडुरंग शीरसाठ व रामचंद्र नामदेव ईधारे हे करणार आहेत.
जोरदार शक्तिप्रदर्शन करून भक्ती शक्ती उड्डाणपूल येथे संत तुकाराम महाराज पालखी पादुका एसटी बस थांबविण्यात येणार आहे एसटी बस थांबली नाही तर रास्ता रोको आंदोलन करुन एसटी बस समोर झोपून निषेध व्यक्त केला जाणार आहे ,मुख्यमंत्री व पुणे जिल्हाधिकारी साहेब ह्यांना संत तुकाराम महाराज पालखी पादुका एसटी बस थांबविण्यासाठी दोन वेळा लेखी पत्राद्वारे मागणी केली होती दिनांक १९/७/२०२१ देहू ते पंढरपूर एसटी बस ने पालखी पादुका कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्या संदर्भात भक्ती शक्ती उड्डाणपूल येथे भाविकांना दर्शनासाठी एसटी बस थांबविण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर ह्यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे , असे पत्र द्वारा सांगितले आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारी म्हणून गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील मानाच्या संतांच्या पादुका ‘पंढरीत नेण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. यापार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा जेष्ठ वद्य सप्तमीला तर तीर्थक्षेत्र आळंदीतून जेष्ठ वद्य अष्टमीला माऊलींच्या चलपादुकांचे प्रस्थान करण्यात आले होते. मात्र त्या दिवसापासून संतांच्या पादुका देहू व आळंदीतच मुक्कामी आहेत.
सोहळ्यांना प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी केली जाणार आहे. कालाच्या कार्यक्रम पार पडल्यानंतर पौर्णिमेच्या (दि. २३) दिवशी वारी परतीसाठी आळंदीकडे प्रस्थान ठेवेल.
Discussion about this post