व्हीएसआरएस न्युज पुणे- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात आला.
पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. यानिमित्त 500 शहाळ्यांमध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले.
वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांच्या हस्ते गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला. बुधवारी सूर्योदयावेळी हा सोहळा पार पडला. तसेच मंदिरामध्ये गणेशयाग देखील झाला.
वैशाख वणव्यापासून रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या यासोबत करोना संकट लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, ‘भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. ससूनमधील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे.’