व्हीएसआरएस न्युज बुलढाणा -बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोरील चार वाहने पेटवण्याचा प्रकार बुधवारी पहाटे घडला. त्यांच्या घरावर ही भ्याड हल्लाच्या प्रयत्न झाला. तातडीने आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. गायकवाड कुटुंबीयांना इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा हल्ला केल्या गेल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे.
दरम्यान, हा हल्ला करतेवेळी या परिसरातील विद्युत पुरवठा हल्लेखोरांनी तोडला होता, असेही सांगण्यात आले.
मागील काही दिवसांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांनी आमदार गायकवाड चर्चेत आहेत.
ते कामानिमीत्त मुंबईला गेले होते. मंगळवारी रात्री उशीरा ते परतले. बुधवारी पहाटे दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून त्यांच्या निवासस्थानी आल्या. पेट्रोल टाकत चार वाहने पेटवून दिले. वाहनाला आग लागल्यानंतर सायरन वाजल्याने गायकवाड कुटूंबीय घरातून खाली येत वाहनाकडे धावले. तातडीने ही आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.
आ. संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली. चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले. पथकाने हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.