व्हीएसआरएस न्युज निगडी- भक्ती शक्ती चौकात अग्रसेन महाराज यांचा पुतळा शुशोभिकरण करा अशी मागणी भाजपा उपाध्यक्ष सचिन काळभोर वतीने आयुक्त यांच्याकडे मागणी करण्यात आली.
निगडी प्राधिकरण येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल खाली भेळ चौक ह्या मार्गाकडे जाताना श्री अग्रसेन महाराज पुतळा रस्त्याच्या उजव्या बाजूला ठेवण्यात आला आहे ,
तो परिसर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने सुशोभीकरण करण्यात यावा तसेच पुतळा परिसरात उद्यान विकसित करण्यात यावे चांगल्या प्रकारची झाडे बसण्यासाठी बाकडे व ओपन जिम पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर पुतळा सुशोभीकरण करून या भागाचे चांगले नियोजन करून हा परिसर विकसित करण्यात यावा.
श्री अग्रसेन महाराज पुतळाच्या वरती मेघडंबरी बसवण्यात यावी जेणेकरून पुतळ्या वरती छत्र कायमस्वरूपी राहील खुप पुर्वी पासुन श्री अग्रसेन महाराज ह्याचा पुतळा ह्या परिसरात होता भक्ती शक्ती उड्डाणपूल बांधकाम सुरू करण्यात आले ,त्यामुळे श्री अग्रसेन महाराज पुतळा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यात आला होता.
तरी लवकरात लवकर अग्रवाल समाज व परमपूज्य श्री अग्रसेन महाराज यांचा पुतळा सुशोभिकरण करण्यात यावा ही नम्र विनंती सचिन काळभोर यांनी निवेदन द्वारा केली आहे.
Discussion about this post