व्हीएसआरएस न्युज पिंपरी दि.२८-सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक मिलिंद ढवळसकर यांचा प्रदेश संघटक विजय कुंभार, पुणे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अनुप शर्मा कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे शहर कोर कमिटी सदस्य वैजनाथ शिरसाट यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला..
मिलिंद ढवळसकर यांच थेरगाव भागामध्ये गेले अनेक वर्ष सामाजिक कार्य चालू आहे
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2022च्या पार्श्वभूमीवर प्रवेश केल्याचे समजते
2019 मध्ये चिंचवड विधानसभेसाठी त्यांनी तयारी केली होती . ते एमडी ग्रुप चे अध्यक्ष आहेत तसेच पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र म्हणून जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
प्रवेशाच्या वेळी आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याची त्यांनी ग्वाही दिली.. यावेळी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष स्मिता पवार, महेश बिराजदार, वाहाब शेख, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post