व्हीएसआरएस न्युज पिंपरी- वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे हे या पथकाचे प्रमुख होते. त्यांच्याकडून ही जबाबदारी आता सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड शहराची धुरा सप्टेंबर 2020 मध्ये स्वीकारली. त्यानंतर शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली होती.
या पथकाची जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर सामाजिक सुरक्षा पथकाने शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर जोरात कारवाई केली. एक प्रकारे सामाजिक सुरक्षा पथकाने शहरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांवर पोलिसांचा धाक निर्माण केला.
विठ्ठल कुबडे यांना अद्याप कोणताही पदभार देण्यात आलेला नाही. पुढील आदेशापर्यंत सामाजिक सुरक्षा विभागाचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे यांच्याकडे असणार आहे. अचानक झालेल्या या बदलीमुळे शहर पोलीस वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
Discussion about this post