व्हीएसआरएस न्युज कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु होणार आहेत. येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु होतील. शिक्षण विभागाने मुख्यमंत्री कार्यालायला प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजुर झाला आहे.
शाळा सुरु करण्याचा निर्णय झालेला आहे. जिल्हानिहाय कोरोनाची स्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय होईल, अशी माहिती आहे. कोणत्या वर्गांच्या शाळा सुरु होणार यासंदर्भात अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र, गेल्या दीड वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा सुरु होत असल्यानं विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी ही आनंदाची बाब आहे.
Discussion about this post